Breaking News

पाशा पटेल यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याची पत्रकारांची मागणी

लातूर, दि. 22, सप्टेंबर - महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना अध्यक्षपदावरुन हटवा अशी मागणी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या  मागणीचे निवेदन पत्रकारांनी आज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सुपूर्त केले. 
पत्रकार विष्णू बुरगे यांना सार्वजनिक ठिकाणी पटेल यांनी अतिशय अर्वाच्य आणि अश्‍लाघ्य शब्दात शिवीगाळ केली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.  लातुरच्या पत्रकारांनी गांधी चौकात धरणे आंदोलन केलं. त्याला जनमाणसातून मोठा पाठिंबा मिळाला. अनेक स्थानिक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि  नागरिकांनी पाठिंबा दिला. पाशा पटेल यांच्या या कृतीमुळे सबंध पत्रकारितेचा अवमान झाला असून त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना त्वरीत  पदमुक्त करावे असे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.