Breaking News

सरकारवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा; खा. पटोलेंची पुन्हा स्वपक्षावर आगपाखड

नागपूर, दि. 24, सप्टेंबर - आपल्याच सरकारच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या खा. नाना पटोले यांनी आज नागपुरात थेटठ सरकारवर फौजदारी गुन्हा दाखल  करण्याची मागणी केली. मच्छीमारांवर शासन अन्याय करीत असल्याचा पटोले यांचा आरोप आहे.
नागपुरात आयोजित मच्छीमार मेळाव्यात बोलताना खा.पटोले म्हणाले की, एकीकडे स्कील इंडियाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या गोष्टी सांगितल्या जातात तर  दुसरीकडे पारंपरिक व्यवसाय नष्ट करण्याचे षडयंत्र आखले जातेय. तलावात मासेमारी साठी सरकार वार्षिक भाडे आकारले जाते.परंतु, नागपूर जिल्ह्यातील तलावात  दोन महिन्यांहून अधिक काळ पणीच नसते. त्यामुळे सरकारचा अध्यादेश पारंपरिक मच्छीमारांवर
अन्याय करणारा आहे. त्यामुळे या सरकारवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. आपल्याच सरकारवर आरोप करणार्‍या पटोले यांनी आपल्याला  कुठल्याही पदाचा लोभ नसल्याचे सांगितले. दिल्लीतील खासदारांकडे सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे.परंतु, आपल्याला कुठल्याही गोष्टींचा तसूभरही लोभ  नसल्याचे त्यांनी सांगितले.