Breaking News

महागाईसह अन्य मुद्यांवर केंद्र व राज्य सरकार अपयशी - शरद पवार

पुणे, दि. 24, सप्टेंबर - नोटा रद्द, वस्तू व सेवा कर यांसारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या घोषणांनंतर आता महागाईमुळे जनता त्रासली आहे. यामुळे गेल्या तीन  वर्षांत केंद्र व राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली.
सरकारला महागाईवर नियंत्रण ठेवता आले नाही. पेट्रोल, डिझेल यांची भाववाढ थांबवणे सरकारच्या हातात असूनही ती थांबवता आलेली नाही. महागाईमुळे  सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत सर्व समविचारी पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्रित व्हायला हवे. जेणेकरून जनतेला चांगला पर्याय  निर्माण केला जाऊ शकतो, असेही पवार यांनी सांगितले. सध्या देशासह राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर विचार करण्यासाठी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची  मुंबईत बैठक बोलावली आहे, असेही पवार यांनी सांगितले.