Breaking News

ज्या शहरात मेट्रो धावते, तेथे विकासाची कवाडे उघडी होतात - राजनाथ सिंग

नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - ज्या शहरात मेट्रो धावते, तेथे विकासाची कवाडे उघडी होतात, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज येथे केले.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईक व गृह मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत मंगळवारी लखनौ मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते. नवाबांचे शहर म्हणून ओळख असलेल्या लखनौना आता मेट्रो प्रकल्पामुळे नवीन ओळख मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मेट्रो प्रकल्पाने मुख्य सल्लागार, मेट्रोमॅन श्रीधरन यांचे वशेष आभार मानले. उत्तर प्रदेशमध्ये अन्य काही शहरांमध्येही  मेट्रो प्रकल्प सुरू करण्याबाबत आम्ही विचाराधीन आहोत. उत्तर प्रदेश मेट्रो कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तीन वर्षात 50 शहरांमध्ये  मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्या दिशेने योग्य वाटचाल सुरू आहे, असे ते म्हणाले. ट्रान्सपोर्ट नगर ते चारबाग या मार्गावर सध्या  मेट्रो धावणार असून नंतर या प्रकल्पाचा विस्तार केला जाईल. सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत प्रवासी मेट्रो प्रवास करू शकणार आहेत. उद्यापासून ही सेवा  प्रवाशांसाठी खूली होणार आहे.