Breaking News

माझा भारत स्वतंत्र आहे का...?

दि. 23, सप्टेंबर - भारत स्वतंञ झाला की अजूनही पारतंञ्यातच आहे, अशी शंका स्वातंञ्य मिळाल्या नंतर पन्नास वर्षानंतर भारतियांच्या मनात डोकाऊ लागली  होती. सत्तर वर्षाच्या सत्तातंरानंतर देशाचा कारभार हाती घेतलेल्या मोदी सरकारने भारतीयांच्या मनात घर केलेल्या पारतंञ्यांच्या शंकेवर शिक्कामोर्तब केले आहे.  स्वतंञ देशाचे नागरिक म्हणून भारतीयांना कुठले अधिकार आहेत, कुठल्या अधिकाराचा वापर करायचा हा निर्णय नागरीक नाही तर विशिष्ट विचारसरणीची बटीक  बनलेली व्यवस्था घेऊ लागली आहे. देश विकासाच्या मार्गावर झेपावत असल्याच्या वल्गना होत असताना नागरिकांच्या मुलभूत हक्क अधिकारांना गोठविण्याची प्रक्रीया  सुक्ष्मपणे सुरू आहे. वन वे ट्रफिक असे देशभर वातावरण निर्माण झाले आहे. देश बदल रहा है... पण कसा?
अंधश्रध्दा व्यक्तीगत आणि सार्वजनिक हिताचा क्रमांक एकचा शञू आहे. हे अनुभवातून माहीत असतांना आम्ही भारतीय अंधश्रध्देचे उपासक म्हणून अभिमानाने जगत  आहोत. श्रध्दा आणि अंधश्रध्दा या दरम्यान असलेली पुसट सिमा रेषा लक्षात येत नाही. आम्ही वाहवत जातो.कर्तव्यापेक्षा भावनेला अधिक महत्व देतो. माञ याच  भावनेचा ज्यांच्यावर अंधपणे श्रध्दा ठेवली तेच भर बाजारात लिलाव करतात तेंव्हा जाणीवपुर्वक केलेली चुक लक्षात येऊनही सुधारू शकत नाही,कारण तोपर्यंत सारं  संपलेलं असतं.
भारतीय राजकारणाचा र्हास होण्यास हीच अंधश्रध्दा कारणीभूत आहे. आम्ही राजकारण्यांना एकदा डोक्यावर घेतले की जोपर्यंत तो राजकारणी डोक्यावर बसून  पायाच्या नखाने नरडी फोडत नाही तोपर्यंत आम्ही भानावर यायला तयार नसतो,
आम्हा भारतीयांच्या बाबतीत ही मोठी शोकांतिका आहे. स्वातंञ्योत्तर भारतात पहिले स्वदेशी सरकार स्थापन झाल्यानंतर स्वर्गसुखाच्या आनंदात नाचणार्या  भारतीयांची नशा अल्पावधीतच उतारू लागली. तीस चाळीस वर्षानंतर तर खरोखर आम्ही स्वतंञ आहोत का असा प्रश्‍न भारतीय एकमेकांना विचारू लागले. गोरे गेले  काळे आले इथपर्यंत आम्ही आमच्या राज्यकर्त्यांची निर्भत्सना करू लागलो. यावरून आमच्या सरकारकडून आम्हा भारतीयांचा भ्रमनिरास झाला हे स्पष्ट होऊ लागले.
स्वातंञ्याच्या सत्तरीत आल्यानंतर या भावना अधिकच प्रबळ बनल्या. आम्ही पर्यायाच्या शोधात असतांना नरेंद्री मोदी नावाच वादळ गुजरातच्या सिमेवरून दिल्लीच्या  दिशेने घोंघावू लागले होते, या वादळाने सत्तर वर्षाचा हिशेब मांडत भारतीयांच्या मनात स्थान निर्माण करून आशेचा किरण पेरला होता. जनतेची नाडी ओळखून  सत्तेचे तख्त काबीज करण्याइतपत पाञता असलेल्या नरेंद्र मोदींना जनमानसात मिळालेले स्थान कुणा मसिहापेक्षा कमी नव्हते. भारतीयांनी त्यांना डोक्यावर घेतले.  तीन वर्षानंतर मोदींवर भारतीयांनी व्यक्त केलेली निस्सीम श्रध्दा अंधश्रध्दा होती हे मोदींच्या नानाविध करिश्म्याने दाखवून दिले आहे. आज पुन्हा स्वातंञ्याविषयी  भारतीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली आहे. मोदी किंवा मोदींच्या एखाद्या निर्णयावर बोलण्याचे, लिहीण्याचे स्वातंञ्य अप्रत्यक्षपणे नाकारले जात आहे.  सोशल मिडीयाचा मुक्त वापर करून सत्ता मिळवलेली मंडळी त्याच सोशल मिडीयावर निर्बंध लादू पहात आहेत. कुणी मोदींविरूध्द आपले मत मांडण्याची आगळीक  केलीच तर त्याला गुन्हेगार ठरविले जात आहे, पोलीस यंञणेकडून अभिव्यक्ती स्वातंञ्याचा गळा दाबणार्‍या नोटीस पाठवल्या जात आहेत. म्हणूनच कधी कधी  बदलणार्‍या या देशात खरोखर स्वातंञ्य आहे का? नागरिकांना घटनेने दिलेले मुलभूत अधिकार पायदळी तर तुडविले जात नाहीत ना..? अशी शंका भारतीयांच्या  मनात पिंगा घालू लागली आहे.