Breaking News

शिवचरित्राच्या प्रेरणेने गडकिल्ले हस्तगत करावेत शिवचरित्रकार प्रा. संदीप कदम यांचे मत

अहमदनगर, दि. 03, सप्टेंबर - शिवराय, शंभुराजे, फुले, शाहू, आंबेडकर या महापुरूषांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी अतोनात कष्ट केलेले आहेत. त्यांच्या  इतिहासापासून प्रेरणा घेवून आधुनिक काळातील गडकिल्ले म्हणजेच स्पर्धा परीक्षा क्षेत्र, कला क्षेत्र, साहीत्य क्षेत्र, प्रचार-प्रसार माध्यम क्षेत्र काबीज करण्याचे आवाहन  शिवचरित्रकार प्रा. संदीप कदम यांनी व्यक्त केले. 
तालुक्यातील सोनेगाव येथे शुक्रवारी ठाणे येथील व्याख्याते व दुर्ग अभ्यासक प्रा. कदम यांचे शिवचरित्रपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी  वरील मत व्यक्त केले.  प्रारंभी भैय्या बोलबट यांच्या हस्ते प्रा. कदम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवस्फूर्ती समूहाचे सचिव विवेक मोरे यांच्यासह अशोक पठाडे, संभाजी ब्रिगेड, वाशीचे तालुकाध्यक्ष आशिष पाटील, खर्डा येथील  सामाजिक कार्यकर्ते  भीमराव घोडेराव, सौताडा येथील बाबुरावजी टेकाळे, बीड येथील ठोसर, तसेच पोतेवाडीचे युवराज पोते, जवळा येथील अवधूत पवार, भूम  येथील शिवस्फूर्ती समूहाचे  कल्याण पटेकर आदी उपस्थित होते.
सोनेगाव येथील राजे ग्रुप, शंभुराजे ग्रुप, स्वराज्य ग्रुप, खंडोबा मित्र मंडळ, नागराज मित्र मंडळ, निलेश गायवळ मित्र मंडळ व गणेश मंडळ यांच्या प्रयत्नाने या  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बिरंगळ यांनी केले. सूत्रसंचालन किशोर गायवळ यांनी केले. सुजित दिंडे यांनी आभार  मानले.