Breaking News

दुसरबीड येथे शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न

बुलडाणा, दि. 03, सप्टेंबर - शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सप्टेंबर  रोजी राधाकृष्ण कार्यालय दुसरबीड येथे शिवसेना सिंदखेड राजा तालुक्याची पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक संपन्न झाली.
यावेळी सिंदखेड राजा तालुक्यातील पदाधिकार्‍यांचा आढावा घेऊन विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख यांना, पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना यावेळी  देण्यात आल्या. उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, विधानसभा संघटक आत्माराम कायंदे, उपजिल्हा प्रमुख बाबुराव मोरे, तालुका प्रमुख  सतीश काळे, युवासेना तालुका प्रमुख सिद्धेश्‍वर आंधळे, माजी सरपंच दिलावरशेठ, उप जिल्हा प्रमुख लखन गाडेकर यांनी संबोधित केले. सूत्र संचालन प्रा.आंधळे सर  यांनी केले. या बैठकीला सिंदखेड राजा तालुक्यातील शिवसेनेचे नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग  प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.