Breaking News

कृषी उत्पादने जागतिक बाजारात नेण्यासाठी धोरण तयार करणार - सुरेश प्रभू

नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - देशांतर्गत कृषी उत्पादने जागतिक बाजारात नेण्यासाठी लवकरच धोरण तयार केले जाईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग  मंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली. एका कृषी संमेलनात ते बोलत होते.
मंत्रालयाकडून कृषी क्षेत्रासाठी एक जागतिक पुरवठा साखळी विकसित करण्याचे काम केले जाईल. देशात कृषी निर्यातीला गती देण्यासाठी विविध स्तरावरील निर्बंध  हटवण्याची आवश्यकता आहे. शेतक-यांकडून उत्पादित केलेला माल जागतिक स्तरावर पेहोचला पाहिजे आणि त्याला चांगला भावही मिळाला पाहिजे. यासाठी  लवकरच धोरण तयार केले जाईल, असे प्रभू यांनी सांगितले.