Breaking News

गणेशोत्सवानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुलांना शालेय वस्तूंचे वाटप

ठाणे, दि. 02, सप्टेंबर - महाराष्ट्र चाईल्ड डेव्हपलमेंट लेबर वेल्फेअर सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त ठाणे आणि पालघर  जिह्यातील बालशिक्षण सुधार गृह, आदिवासी, मागासवर्गीय, बालमजदूर, भटक्या - विमुक्त जातीजमाती मधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ओवळा नाका येथील महाराष्ट्र बालशिक्षण सुधार केंद्र येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून ठाण्याच्या महापौर सौ. मिनाक्षी शिंदे, शिवसेना उपनेते  अनंत तरे, अभिनेत्री नम्रता संभेराव, कल्पना जैन, पत्रकार कैलाश म्हापदी आदी मान्यवरांच्या हस्ते गणवेश, चप्पल-बुट, वह्या, शालेय बॅगचे वितरण करण्यात  आले. सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.