पंतप्रधानांच्या परदेश दौ-यांची माहिती आता गुगल मॅपद्वारे मिळणार
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय दौ-यांबाबतची माहिती आता गुगल मॅपच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. पंतप्रधान यांनी कोणत्या देशाचा दौरा कधी केला याची संपूर्ण माहिती त्यात मिळू शकणार आहे.
पंतप्रधान सध्या पाच दिवसांच्या चीन आणि म्यानमार दौर्यावर असून या दौर्यादरम्यान ते ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या परदेश दौ-यामुळे विरोधी पक्ष त्यांच्यावर वारंवार टीका करतात. मात्र, काही प्रमुख देशांबरोबरच्या संबंधात या कालावधीत झालेली सुधारणा पाहता पंतप्रधानांचे दौरे महत्त्वपूर्ण असल्याचे केंद्र सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले आहे.