आंबेडकरवादी दलित संघटना नक्षलवादाला बळी पडणार नाहीत - खा. अमर साबळे
पुणे, दि. 04, सप्टेंबर - जगाला कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाची मोहिनी पडू पहात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सचे तत्वज्ञान नाकारून प्रज्ञा, शिल, करुणा, मैत्री आणि निर्वाण या तत्वज्ञानावर आधारित भगवान गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारला. हे सत्य जाणून घेणार्या आणि डॉ. आंबडेकरांवर श्रद्धा असणार्या कोणत्याही आंबेडकरवादी दलित संघटना नक्षलवादाला बळी पडणार नाही, असा विश्वास राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला आहे.
आदिवासी क्षेत्रात मोदी सरकारची भरीव विकास कामे व राज्य सरकारच्या नक्षलवाद विरोधातील जोरदार पोलीस कारवाईमुळे आदिवासींची भरती कमी होऊ लागल्याने नक्षलवाद्यांच्या रडारवर दलित संघटना आहेत. त्यासाठी दलित अत्याचारग्रस्तांच्या मुलाखती व त्या घटनांचे चित्रिकरण करून ते दलित संघटनांना दाखवून त्यांची माथी भडकविण्याचे षडयंत्र नक्षलवादी करत असल्याचा आरोप खासदार अमर साबळे यांनी केला आहे.
हैदराबाद विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली तसेच देशातील अन्य विद्यापीठांसाठी स्वतंत्र कमांडरची नियुक्ती करून आता महाराष्ट्रात पुणे व नगर टेरिटरी निर्माण करून त्या क्षेत्रात नक्षलवाद्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध उघड झाल्याने तुरुंगाची हवा खाऊन बाहेर आलेले कार्यकर्ते वेगळ्या मंचावरून क्रांती व परिवर्तनाची गाणी दलित मोहल्ल्यामध्ये गाऊन आपला जनाधार वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न आंबेडकरवादी दलित संघटनांनी हाणून पाडून स्वतःचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे आवाहन खासदार अमर साबळे यांनी केले आहे.
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 2 दलित स्वयंसेवकांच्या हत्या डाव्या विचारसरणीच्या मारेकर्यांनी केल्या. त्याचा साधा निषेध सुद्धा डाव्यांनी केला नाही. परंतु, रोहित वेमुला हा दलित नसल्याचा निर्वाळा चौकशी आयोगाने देऊन सुद्धा तो दलित असल्याचा खोटा प्रचार करून डाव्यांनी व त्यांना बळी पडलेल्या दलित संघटनांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व मोदी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. असा, आरोप करून खासदार साबळे यांनी सदर जाती-धर्मामध्ये दुही, तणाव व संघर्षातून अराजक माजविणार्या षडयंत्रापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदार अमर साबळे यांनी नक्षलवाद्यांच्या षडयंत्राची सविस्तर माहिती देऊन त्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी केली आहे.
नक्षलवाद ही देशासमोरील गंभीर समस्या असून सरकार पूर्ण ताकदीने ती मोडून काढेल. तसेच दलितांच्या उद्धारासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास दिल्लीतील महाराष्ट्र व गोव्याच्या खासदार यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला होता.