श्रीगोंद्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु
अहमदनगर, दि. 21, सप्टेंबर - श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी, घोगरगांव व बेलवंडी या प्रतिष्ठित गावासह 10 गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रामुख्याने भा.ज.प नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते ,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस , आमदार राहुल जगताप ,जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी आपल्या गावच्या ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
तालुक्यात दिनांक 7 आक्टोबर 2017 रोजी काष्टी, घोगरगांव ,बेलवंडी ब्रु, चवरसांगवी,थिटे सांगवी ,बनपिप्री, तांदळी दुमाल ,माठ, पारगांव सुद्रीक तरडगव्हाण या 10ग्रामपंचायतीची निवडणूक होत असल्याने दिनांक 15सष्टेबर ते 22 सष्टेबर पर्यंत अर्ज विक्री व स्विकृती सुरू आहे . काष्टी घोगरगांव , बेलंवडी व बनप्रिंपी हे तालुक्यातील प्रतिष्ठीत नेत्यांची गावे असल्याने आपल्या पॅनलच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
काष्टी येथील ग्रामपंचायत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या ताब्यात आहे पुन्हा ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी जि.प.सदस्य सदाशिव पाचपुते मोर्चे बांधणी करत आहेत. तर त्यांना प्रतिशह देण्यासाठी काष्टी सेवा संस्थेचे अध्यक्ष भगवानराव पाचपुते दुसरा पॅनल तयार केला असल्याचे दिसते तर माजी मंत्री पाचपुते यांचे तिसरे विरोधक नागवडे सहकारी कारखान्याचे संचालक अरुण पाचपुते व कैलास पाचपुते एकत्रित येऊन तिसरा पर्याय देणार असल्याचे चित्र दिसत आहे. असे झाले तर काष्टी येथे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना शह देण्यासाठी तीन पॅनल होण्याची शक्यता आहे.
बेलवंडी ग्रामपंचायत जिल्हा परिषद माजी उपध्यक्ष व पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आण्णासाहेब शेलार यांच्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार राहूल जगताप हे प्रतिष्ठा पणाला लावत आहेत तर आण्णासाहेब शेलार यांच्या ताब्यातून ग्रामपंचायत घेण्यासाठी माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी ही प्रतिष्ठा पणाला लावली आहे.पण सरपंचपद अनु.जाती/ जमाती साठी राखीव असल्याने व थेट जनतेतून निवड असल्याने अनेकांच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच घोगरगांव मध्ये देखील जि.प.च्या निवडणुकी नंतर ग्रामपंचायती मध्ये जि. प. माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस विरुद्ध जि.प. सदस्य सचिन जगताप असाच रणसंग्राम होणार आहे. सरपंच पद सर्वसाधारण असल्याने बाबासाहेब भोस याचे बंधु डॉक्टर दिलीप भोस यांच्या विरुद्ध सचिन जगताप यांचे निकटवर्तीय बाळासाहेब उगले रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती पेक्षा विकासात्मक दृष्टीकोनातून ग्रामपंचायतील महत्त्व प्राप्त झाले आहे म्हणून तालुक्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 22 सष्टेबर रोजी शेवटची मुदत असून दिनांक 25 सष्टेबर रोजी छाननी होणार आहे तर दिनांक 27 सष्टेबर रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे आणी मतदान दिनाक 7 आक्टोबर रोजी होत आहे.