Breaking News

त्र्यंबकेश्‍वर : हॉटेलवर पोलिसांचे छापे; तीन सज्ञान मुलींची सुटका

त्र्यंबकेश्‍वर, दि. 11, सप्टेंबर - त्र्यंबकेश्‍वर रोड वरिल दि बॉस हॉटेलवर पोलिसांचे छापे टाकून तीन सज्ञान मुलींची सुटका केली आहे सदर ठिकाणी हॉटेल  व्यवसायाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निर्देशास आले असून 1) रवी शिंदे वय 36 2) राजीव पाटील वय 41 दोघे राहणार नाशिक याना ताब्यात  घेतले आहे या इसमा विरोधात त्र्यंबकेश्‍वर पोलीस स्टेशनला पिटा कायद्यानव्हे कारवाई करण्यात आली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्‍वर शहरातील  सार्वजनिक ठिकाणी शांतततेचा भंग करणारे टवाळखोर 23 मुले व 23 मुलींनिवर पोलिसांनी कारवाई करून सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान ताब्यात घेतले होते  त्यानंतर पोलीस स्टेशनला नेऊन चौकशी अंती सोडून देण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्‍वर रोडवर बाहेरील येणार्या नागरिकांना निवासासाठी लॉज उभारण्यात आले आहेत; पण गेल्या काही वर्षांत या लॉजचा गैरवापर होताना दिसत असल्याची  चर्चा होती. गेले अनेक दिवस लॉजचा वेशया व्यवसायासाठी गैरवापर करत आहेत, असा आरोप नागरिक करत होते. पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नव्हती;  पण शनिवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व त्यांच्या अन्य सहकारी पथकाने दि बॉस हॉटेलवर भर दुपारी छापा टाकून दोन पुरुषाना ताब्यात  घेत 3 सज्ञान मुलींची येथून सुटका केली.
अल्पवयीन प्रेमीयुगुलांना त्यांच्या पालकांना बोलावून व समज न देताच सोडून दिले. पोलिसांच्या संशयास्पद कारवाईमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत  होता.अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून पहिल्यादाच तुम्ही मोठया प्रमाणात कारवाई केली परंतु कोणतीही कारवाई न करता त्यांना जाऊ दिले असल्याने ताब्यात  घेतलेल्या प्रेमी युगुलांवर काय कारवाई केली हे पोलिसां कडून कळू शकले नाही.
अल्पवयीन प्रेमीयुगुलांना त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्यासमोर त्यांची मुले बाहेर येऊन काय दिवे लावतात याची कल्पना देऊन त्यांना सोडणे गरजेचे होते.परंतु  पोलिसांनी तसे न केल्याने कारवाई संशयास्पद आहे,असा आरोप उपस्थित नागरिकांनी केला.