Breaking News

आप गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार - गोपाल राय

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - आम आदमी पक्ष गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आपचे गुजरात प्रभारी गोपाल राय यांनी  आज दिली. गुजरात नो संकल्प’ या नावाने प्रचार अभियानाची सुरुवात करणार आहे. 17 सप्टेंबर रोजी अहमदाबादमध्ये पहिला ॠरोड शो’ केला जाणार असल्याचे  राय यांनी सांगितले.
गुजरात राज्यात अनेक वर्षे भाजपची सत्ता आहे. मात्र राज्यातील जनतेच्या अपेक्षा सरकारकडून पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. काँग्रेस पक्ष फुटीच्या मार्गावर आहे. अशा  स्थितीत गुजरातमधील जनतेला पर्याय हवा असून तो आम आदमी पक्षच देऊ शकते, असा विश्‍वास राय यांनी व्यक्त केला. राज्यात ज्या ठिकाणी पक्षाचे कार्य वाढत  जाईल आणि आम्हाला जिथे चांगला उमेदवार मिळेल, त्या ठिकाणी निवडणूक लढवणार, असे राय यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देतांना सांगितले.