Breaking News

नोएडात 13 बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - सदनिका खरेदी करणा-यांची फसवणूक करून करोडो रुपयांचा गंडा घालणा-या 13 बांधकाम व्यावसायिकांविरोधात नोएडा  भागातील सहा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील केवळ 9 गुन्हे आम्रपाली, एक सुपरटेक व तीन अन्य बांधकाम व्यावसायिकांविरोधात  आहेत.
31 ऑगस्ट रोजी सदनिका खरेदी करणा-या ग्राहकांच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत तक्रार केली. यामध्ये फसवणूक  करणा-या बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यानंतर मंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे वरिष्ठ  पोलीस अधिक्षकांचे प्रसिद्धी प्रमुख प्रभात दीक्षित यांनी सांगितले.