Breaking News

नोटा रद्द नंतर बँकांत पैसे जमा करणार्‍यांपैकी अनेकांनी आयकर विवरण पत्र कधीच भरले नव्हते

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - ज्या व्यक्ती व व्यापारी संस्थांनी दोन लाख कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली आहे, त्यांनी कधीही आयकर विवरण पत्र सादर  केलेले नाही, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अहवालातून समोर येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण 22 लाख 22 हजार कर चुकवणारे  असून यापैकी 21 लाख 12 हजार व्यक्ती, 11 हजार 579 कंपन्या आणि उर्वरित 57 हजार 693 छोटे उद्योग / फर्म्स), न्यास (ट्रस्ट), हिंदू अविभक्त कुटुं बे  आहेत .
नोटा रद्दच्या निर्णयानंतर रोख रक्कम भरणा-या संशयितांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत आयकर विवरण पत्र सादर न करणार्‍या लोकांनी चलनातून  रद्द केलेल्या 1.02 लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या आहेत. एकूण रोख रक्कम जमा करणा-या व्यक्तींपैकी एक-तृतीयांश जणांनी त्यांच्या उत्पन्नाचा  तपशील सादर केलेला नाही. त्या खालोखाल 24.71 टक्के न्यास, 47 टक्के व्यक्तींच्या सहका-यांनी (असोसिएट्स ऑफ परसन्स) कर विवरण पत्र सादर केलेले  नाही.