Breaking News

’मी कार्ड’साठी अर्ज करण्याचे ’पीएमपीएमल’चे आवाहन

पुणेे, दि. 30, सप्टेंबर - पुणे महानगर परिवहन मंहामंडळाने (पीएमपीएल) अंध, दिव्यांग, मुकबधीर, अस्थीव्यंग प्रवासी नागरिकांना दिलेले कागदी पास वापरण्यासाठी 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच दिव्यांग नागरिकांनी ’मी कार्ड’साठी 15 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, पीएमपीएमल प्रशासनाने केले.पुणे महानगर परिवहन मंहाडळाने (पीएमपीएल) एप्रिल 2017 पासून अंध, अपंग, बधिरमुक, अस्थीव्यंग प्रवासी नागरिकांना ’मी कार्ड’ योजना लागू केली आहे. तत्पूर्वी दिव्यांग प्रवासी व्यक्तींना ’मी कार्ड’ प्राप्त होईपर्यंत कागदी पद्धतीचे पासेस वापरण्यात देण्यात आले होते. पीएमपीएलतर्फे दिव्यांग प्रवासी नागरिकांना मॅन्युअली पास वापरण्यासाठी देण्यात आले होते. त्या पासची सप्टेंबर अखेर मुदत संपली होती. दरम्यान, या मुदतीत अनेक दिव्यांग नागरिकांनी ’मी कार्ड’साठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे कागदी पास वापरण्यासाठी दिव्यांग नागरिकांना 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच दिव्यांग नागरिकांनी ’मी कार्ड’साठी 15 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, पीएमपीएमल प्रशासनाने केले आहे.