Breaking News

लोकमंगल फाउंडेशनतर्फे सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन

सोलापूरे, दि. 30, सप्टेंबर - लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने 29 ऑक्टोबरला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर गोरज मुहूर्तावर हा कार्यक्रम होईल, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी दिली. या सोहळ्यात 500 जोडप्यांच्या विवाहाचे नियोजन केले. त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले. या सोहळ्यात सहभागी होणार्‍या जोडप्यांना वस्त्रे, वधूस मणीमंगळसूत्र-जोडवे आणि वर्‍हाडी मंडळींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. संसारोपयोगी साहित्य आणि सोहळ्याची सीडी देऊन जोडप्यांची रवानगी करण्यात येईल. आर्थिक प्रगतीकडे झेपावणारा समाज आणखी सशक्त बनावा या उद्देशाने या उपक्रमाला सुरुवात झाली. आतापर्यंत सर्वधर्मातील हजार 248 जोडप्यांचा विवाह झाला. त्यात बौद्ध, मुस्लिम, ख्रिस्ती, हिंदू, जैन आदींचा समावेश आहे. या पत्रकार परिषदेसाठी सुनील गुंड, विजय जाधव, दिलीप पतंगे, शशी थोरात, संदीप पिस्के उपस्थित होते. जिल्हाभर नोंदणी लोकमंगलसहकारी बँक, पतसंस्था, साखर कारखाना, मल्टिस्टेटच्या जिल्हाभरातील सर्व शाखांमध्ये नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या कार्यालयातही संपर्क साधावा. त्याचा पत्ता : 13 अ, सह्याद्रीनगर, मंत्री सुभाष देशमुख यांचे संपर्क कार्यालय, विकासनगर, सोलापूर. (दूरभाष : 0217- 2322480). मदतीचा हातही... जोडप्यांच्यारेशीमगाठी बांधल्या आणि ते घरी गेले एवढ्यापुरतेच फाउंडेशनचे काम नाही. संबंधितांना लोकमंगल परिवारात नोकरी देण्यात येते. व्यवसाय करू इच्छिणार्‍यांना कर्जही दिले जाते. प्रथम झालेल्या मुलीच्या नावे दोन हजार रुपयांची ठेव ठेवली जाते. आतापर्यंत 150 मुलींना त्याचा लाभ दिल्याचे देशमख म्हणाले.