मुस्लीम बांधवांनी आरतीकरून केले गणेशाचे स्वागत
जालना, दि. 06, सप्टेंबर - भोकरदन तालूक्यातील वालसावंगी येथे आज गणपतीची विसर्जन मिरवणूक मशिदीसमोर आल्यानंतर मुस्लीम बांधवांनी आरतीकरून गणेशाचे स्वगत केले.गणेश मंडळाच्या पदाधिका-यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.या गावात काही दिवसांपुर्वीच मुर्ती विटंबनेच्या घटनेवरून तणाव निर्माण झाला होता. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी हे एकतेचे प्रतिक आहे, असाच सलोखा ठेवावा असे अवाहन केले. या वेळी तंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल कोथळकर, सलीम शाह, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव भुते, उपसरपंच ताराचंद कोथळकर, रमेश शिनकर आदींची उपस्थिती होती.
