Breaking News

बंगळुरूमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या

बंगळुरू, दि. 06, सप्टेंबर - बंगळुरूमधील राजरेश्‍वरी नगरमध्ये ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून आज हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी गौरी यांच्या  घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर गौरी यांचा जागीच मृत्यू झाला.
गौरी या पत्रकार - लेखक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. कर्नाटकातील अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रांसाठी गौरी त्यांनी अनेक लेख लिहिले होते. इंग्रजी आणि कन्नड  भाषेत त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले होते. एका बातमीमुळे त्यांना सहा महिन्यांचा तुंरुगवास भोगावा लागला होता.