सुरक्षा दलावरील दगडफेक प्रकरणी दोघांना अटक
नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. या दोघांचा सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यात नेहमीच सहभाग असे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दगडफेक करणा-या 100 जणांची यादी तयार केली आहे.
यामध्ये कुलगाममधील जावेद व पुलवामामधील कामरान (वय 22) यांचा समावेश आहे. विविध ठिकाणी दगडफेक करताना मिळालेल्या पुराव्यांवरून ही यादी तयार करण्यात आली आहे. या दगडफेकणा-यांनी सुरक्षा दलांच्या जवानांना त्यांच्या कार्यवाहीत अडथळे निर्माण केले होते. ही यादी तयार करताना राष्ट्रीय तपास यंत्रणेने फेसबूक, व्हॉट्स प या सोशल मिडियासह मोबाईल क्रमांकाच्या माहितीचा वापर करून संशयितांची ओळख पटवली आहे. यासाठी तपास यंत्रणेच्या 10 सदस्यीय गटाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या यादीत 100 जण विविध टोळ्यांचे प्रमुख आहेत.