Breaking News

मराठमोळी संस्कृती ही महाराष्ट्राची अस्मिता- देशमुख

नऊवारीत रंगला महिलांचा अनोखा स्नेहमेळावा

अहमदनगर, दि. 13, सप्टेंबर - महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई्र होळकर यांच्यासह संत, थोर पुरुष व विचारवंतांची  समृध्द परंपरा  लाभली आहे. महाराष्ट्राची नऊवारी साडी ही जगातील महिलांची आवड ठरली असून मराठमोळी संस्कृती ही खरी महाराष्ट्राची अस्मिता आहे, असे प्रशंसोदगार शरयू  देशमुख यांनी काढले. 
येथील कृष्णा गार्डन येथे अस्मिता मराठ्यांची या फौंडेशनच्यावतीने आयोजित महिलांच्या नऊवारी साडी स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या.
यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, रचना मालपाणी, डॉ. क्षमा पाटील आदी उपस्थित होत्या. या स्नेहमेळाव्यात महिलांनी मराठमोळ्याा पध्दतीच्या नऊवारी, पैठणी,  शिवकालीन वेशभूषा, पारंपरिक अलंकार परिधान केले होते. खेळमेळीच्या व आनंदादायी वातावरणात स्वतःची ओळख, रॅम्प वॉक व उखाणे स्पर्धा पार पडल्या.  निता सातपुते, अर्चना कडलग, दिपाली पानसरे योती घोंगानेे, शर्मिला देशमुख, रोशनी गडाख, डॉ. श्रद्धा वाणी यांनी विजेतेपद पटकाविले. याप्रसंगी विजेत्यांचा  सन्मान हस्ते करण्यात आला.
शरयू देशमुख यांनी प्रास्तविक केले. नागराध्यक्षा तांबे म्हणाल्या, की महिलांचा विकास तोच खरा कुटूंबाचा व राज्याचा विकास आहे. आधुनिक विचार जोपासतांना  आपली मराठमोळी संस्कृती जपण्यासाठी अस्मिता मराठ्यांची या फाऊंडेशनने चांगले उपक्रम सुरु केले आहेत. यामुळे महिलांच्या कला-गुणांना मोठा वाव मिळणार  आहे. पारंपरिक वेशभूषा हा आपला मोठा ठेवा आहे.  संयोत वैद्य, डॉ. जयश्री जाधव, स्वाती विखे, वैशाली चौपडे, विजया शिंदे, गितांजली सातपुते, प्रियंका गुंजाळ,  प्रतिमा गाडे, सुदेशना वाणी, स्वागत शिंदे, किर्ती साठे, सुवर्णा खताळ, मनोरमा साबवे, प्रिती फटांगरे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.