Breaking News

महाविद्यालयातील प्राचार्याने केला प्राध्यापिकेचा विनयभंग

पुणे, दि. 13, सप्टेंबर - दापोडी येथील एका महाविद्यालयातील प्राचार्याने प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी संबंधित  प्राचार्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 ऑगस्ट 2016 ला घडला होता. या संदर्भातील तक्रार महाविद्यालयाच्या विशाखा समितीकडे  होती. या समितीने नसल्याचा अहवाल दिल्यानंतर पीडित प्राध्यापिकेने काल, सोमवारी (दि.11) भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.विकास पवार (वय  58) असे प्राचार्याचे नाव आहे. पवार याच्याविरोधात 55 वर्षीय प्राध्यापिकेनर दाखल केली आहे. संबंधित प्राध्यापिकेने याबाबत प्रथम महाविद्यालयाच्या ’विशाखा  समिती’कडे तक्रार केली होती. त्यामध्ये तक्रादाराच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचा अहवाल ’विशाखा समिती’ने दिला. त्यानंतर संबंधित प्राध्यापिकेने पोलिसांकडे  तक्रार केली.प्राचार्य पवार यांनी प्राध्यापिकेचे फोटो काढले व स्पर्श करत विनयभंग केला असे प्राध्यापिकेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.