Breaking News

आंगणवाडी कर्मचार्‍यांचा ’जेलभरो’सह मंत्रालयात घुसण्याचा इशारा

सोलापूर, दि. 30, सप्टेंबर -  विविध मागण्यांसाठी मागील 18 दिवसांपासून आंगणवाडी महिला कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. आता त्यांच्या मागण्या मान्य न  झाल्यास झेलभरो आंदोलन करण्याचा इशारा आंगणवाडी कर्मचारी संघटनेने दिला आहे. या आंगणवाडी महिला कर्मचारी व सेविकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याची  प्रमुख मागणी या आंगणवाडी सेविकांची आहे.महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी मानधनवाढ समितीशी झालेल्या बैठकीत आंगणवाडी कर्मचार्‍यांच्या  मानधनवाढीच्या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, या बैठकीत अस्तित्वात नसलेल्या नवीन संघटना व पदाधिकार्‍यांशी बंद खोलीत बैठक घेवून केवळ दीड हजार  रुपयांची पगारवाढ देण्यात आली होती. आंदोलक आंगणवाडी कर्मचारी संघटनांनी शासनाचा हा निर्णय फेटाळत मुळ मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्याचा व  प्रसंगी मंत्रालयात घुसण्याचा निर्णय घेतला आहे.