Breaking News

नोकरीचे आमिष दाखवून 14 लाखांचा गंडा

सोलापूर, दि. 30, सप्टेंबर -  मोठ्या पगाराच्या पदावर नोकरीलावण्याचे अमीष दाखवून 14 लाखांचा गड्डा घातल्याची घटना माढा तालुक्यातील केवड येथे  उघडकील आली आहे. याप्रकरणी पोलीसांनी एका संशयितास अटक केली असुन मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.बाळु बाबासाहेब पासले(रा.केवड  ता.माढा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सुधीर जनार्धन माने याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे.  माढा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत मोबाईल लोकेशन च्या आधारे तपास करत संशयित  आरोपीला तुळजापुर (जि.उस्मानाबाद) येथून ताब्यात घेतले आहे.संशयीत सुधीर माने हा माढा शहरात कराटे चे क्लास घेत होता. तो अनेक वर्षांपासून आष्टी गावात  राहत नसुन त्याचे आई वडिल कष्ट करुन अतिशय हलाखीत राहत असल्याची माहीती ग्रामस्थांनी बोलताना दिली. मानेयाने रयत शिक्षण संस्थेत नोकरीचे आमिष  दाखवत 14 लाख रुपये घेतले. याप्रकरणामुळे लाखोंचा फसवणुकीचा घोटाळा समोर येणार असल्याची शंका व्यक्त होत आहे.