Breaking News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम कडलग यांची नियुक्ती

नाशिक, दि. 24, सप्टेंबर - नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँया अध्यक्षपदी पुरुषोत्तम कडलग यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष  संग्राम कोते पाटील यांनी केली आहे. मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आ.सुनिल तटकरे यांच्या हस्ते कडलग यांना नियुक्ती पत्र देण्यात  आले आहे.त्यानंतर कडलग यांचे नाशिक येथील राष्ट्रवादी भवन येथे आगमन होताच ढोल ताश्याच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत युवक कार्यकर्त्यांनी मोठया  जल्लोशात स्वागत केले.
त्यांनतर राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार यांच्या हस्ते कडलग यांचा सत्कार करण्यात आला. युवक काँग्रेसच्या दालनात कडलग यांनी कारभार  स्विकारला. युवक संघटना ही पक्षाची फाईटिंग ब्रिगेड असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेवून पक्ष संघटन मजबूत करण्यात भर देवू तसेच पक्ष  वाढीसाठी अहोरात्र परिश्रम घेवू असे यावेळी सत्काराला उत्तर देतांना याप्रसंगी नवनियुक्त युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.  रविंद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, मावळते युवक अध्यक्ष सचिन पिंगळे, बहिरू मुळाणे, उमेश खातळे, अरुण मेढे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.