विधान परिषद निवडणूक : योगी आदित्यनाथ यांच्यासह पाच मंत्र्यांचे उमेदवारी अर्ज दाखल
लखनौ, दि. 06, सप्टेंबर - विधान परिषद निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पाच मंत्र्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. हे पाचही जण बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी 15 सप्टेंबर रोजी, तर एका जागेसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, दिनेश शर्मा, मंत्री स्वतंत्र देव सिंग, मोहसिन रजा यांनी अर्ज दाखल केले. त्या वेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या जल्लोषात या सर्व नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.