Breaking News

गणेशोत्सवात समाज उपयोगी फलक

बुलडाणा, दि. 02, सप्टेंबर - स्थानिक आठवडी बाजारातील श्रीकृष्ण नवयुवक सांस्कृतिक क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध समाज उपयोगी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भव्य मोफत दंतरोग तपासणी शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, मोफत स्त्रिरोग व बालरोग तपासणी शिबीर तसेच मुलगी वाचना, मुलगी शिकवा, झाडे लावा-झाडे जगवा, जल है तो जीवन है आदि बाबत समाज उपयोगी संदेश देणारे फलक ऑटो व शहरात मुख्य ठिकाणी लावुन जनजागृती करण्यात आली.   वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होऊन वरुणराजा नाराज झाला आहे. आणि सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे लक्षात घेता श्रीकृष्ण मंडळाने श्री गणेशाच्या मुर्तीच्या माध्यमातुन वृक्ष तोड करनु नको रे बाबा, वृक्ष लागवड करा असा पर्यावरणाचा संदेश देणारी गणरायाची मुर्ती स्थापन केली आहे.