Breaking News

ऑनलाईन अर्ज भरून घेणे बंद करा : आ.बोंद्रेंची मागणी

बुलडाणा, दि. 02, सप्टेंबर - शेतकरी कर्ज माफीसाठी शासन शेतकर्‍यांकडून भरून घेत असलेले कर्जमाफी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी शेतकर्‍यांना प्रचंड त्रास होत असून शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी सदरचे अर्ज शेतकर्‍यांकडून भरून घेण्याऐवजी शासकीय कर्मचार्‍यांची मदत घेवून शासनाने या संदर्भातील माहिती गोळा करावी व शेतकर्‍यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेणे तातडीने बंद करण्यात यावेत, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ठराव घेण्यात यावा यासाठी आमदार राहुल बोंद्रे आक्रमक झाल्याने सभेचे वातावरणात तणाव निर्माण झाला. त्याच बरोबर बुलडाणा जिल्हयातील महिलांकडून दारूबंदीसाठी केले जाणारे विविध आंदोलन, मागण्या याचा विचार करता जिल्हयात संपुर्ण दारूबंदीचा ठराव घेण्यात यावा, यासाठी आमदार राहुल बोंद्रे व जि.प.सदस्या जयश्रीताई शेळके यांनी आग्रही मागणी लावुन धरली. परीणामी सभेत ठरावाला संमती देण्यात आली. हा ठराव शासनाला पाठविल्या नंतर जो पयर्ंत शासन दारूबंदी जाहीर करीत नाहीत, तो पयर्ंत अवैध दारूवर तातडीणे कार्यवाही करीत जिल्हयात कोठेही अवेैध दारू विकल्या जाणार नाही, यासाठी प्रयत्न केले जावेत अशा मागण्यांनी जिल्हा नियोजन समितीची सभा गाजली.
नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची सभा 24 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या सभेत आ.राहुल बोंद्रे यांनी विविध विषयावर आक्रमक स्वरूप धारण करीत काही मागण्या रेटल्या. त्यात जिल्हयातील 2.50 लक्ष शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असे सांगितले जात असतांना, शासनाने घोषणा करूनही कर्जमाफी साठी पात्र या शेतकर्‍यांपैकी  केवळ 1181 शेतकर्‍यांना 10 हजार रुपये अग्रीम कर्ज देण्यात आल्याची बाब मांडून शासनाकडून भरून घेतल्या जात असलेले ऑनलाईन कर्जमाफी अर्जाची प्रक्रीया थांबवून शेतकर्‍यांना या त्रासातून मुक्ती देण्याची मागणी करीत त्या संदर्भात ठराव घेण्याची मागणी केली.अध्यक्षांनी त्यांचे अधिकारात ही मागणी चर्चेला न घेतल्याने यावर सभेत वातावरण तापले. याशिवाय जिल्हयाभरातील अवैध दारू विक्री त्यात अवैध दारू विक्रेत्यावर होत नसलेले कारवाई या बाबी उपस्थित करून संपुर्ण दारूबंदीचा ठराव घेण्याची मागणी करीत हा ठराव शासनाकडून मंजुर होई पयर्ंत पोलीस प्रशासनाकडून अवैध दारू व्रिकी विरोधात मोहिम उभारण्याची आग्रही मागणी आ.राहुल बोंद्रे यांनी केली. त्याशिवाय घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांना ई क्लास व एफ क्लास ची जमीन तातडीने उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मागणी त्यांनी रेटून धरली असता, येणार्‍या 15 दिवसाचे आत संबंधीतांची बैठक घेवून यावर आमंलबजावनी पुर्ण करण्याचे आश्‍वासन जिल्हयाधिकारी बुलडाणा यांनी दिली. सभेत बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री यांचे मतदार संघातील एकफळ या गावातील रस्ता कामासाठी जमीनीचे अधिग्रहन दोन शेतकर्‍यांनी थांबविले, त्यावर मंत्री महोदयांनी जानेवारी महिन्यात प्रशासनास स्पष्ट निर्देश दिले. मात्र या बाबीस आठ महिने उलटूनही अधिग्रह व रस्त्याच्या कामात काहीही प्रगती नाही.
खुद पालकमंत्र्यांनी आदेश देवूनही काम होत नसेल तर इतरत्र स्थिती काय यावर प्रश्‍न चिन्ह उभे केले. शिवाय पालकमंत्री जिल्हयातील असूनही नियोजन समितीच्या सभा 8-8 महिने होत नसल्याचा मुद्या उपस्थित केला, त्यावर दरमहा सभा घेण्याचे आश्‍वासन पालकमंत्री यांनी दिले.