Breaking News

घारगावात महिलेवर अत्याचार

अहमदनगर, दि. 13, सप्टेंबर - तालुक्यातील घारगाव येथील एका विवाहित महिलेवर गावातील एका नराधमाने घरात अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार  घडला आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी लिंपणगाव येथे अदिवासी  समाजाच्या लोकांवर अत्याचार झाल्याची  घटना ताजी असताना घारगावचे हे अत्याचारचे प्रकारण घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबतची  माहिती  अशी की, या अत्याचार  प्रकरणी गावातील प्रमोद अर्जुन पानसरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या शुक्रवारी हा प्रकार  घडला. ही महिला तिच्या घराजवळ आजारी सासर्‍याला लिंबू  पाणी देत असताना त्यावेळी प्रमोद अर्जुन पानसरे हा गाडीवर आला.  त्याने   पप्पू  लोंढे  आणि   पिडित महिलेच्या  पतीला  मारहाण केली.  पिडीत  महिलेने  आपल्या पतीला मारहाण  होताना  पाहिले.  ती भांडणे  सोडविण्यासाठी  पुढे गेली  असता तिलाही   त्याने एक  फटका  मारला  आणि संध्याकाळी पाहून घेतो, असा दम दिला.  त्यानंतर दोन दिवसांनी रात्री 10 चे सुमारास  पिडीत  महिला आणि  तिचा  पती   जेवण करून झोपले असता प्रमोद अर्जुन  पानसरे  हा  घराजवळ आला त्याने या महिलेवर अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास त्याने या महिलेला खून  करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी अद्यापपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली  नव्हती.टाकळी लोणार  येथील अल्पवयीन मुलीवर झालेले अत्याचार, पारगाव सुद्रिक या ठिकाणी  झालेली  मारहाण,  अशा अनेक घटना ताज्या असताना आज  पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला.