Breaking News

मॅक्स केअर सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे शरद पवारांच्या हस्ते रविवारी लोकार्पण

अहमदनगर, दि. 23, सप्टेंबर - नगरच्या आरोग्य विश्‍वात खर्या अर्थाने सरांवरील अत्याधुनिक उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे सावेडी  रोडवरील झोपडी कॅन्टिनमागील मॅक्सकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (रविवार)24 सप्टेंबर रोजी रूग्णसेवेत दाखल होत आहे. यादिवशी सकाळी 10 वाजता माजी  केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण,खा.शरद पवार यांच्या हस्ते हॉस्पिटलचा शुभारंभ होत आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे  पाटील असतील.प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे,विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी  अर्थमंत्री आ.जयंत पाटील,माजी आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय  नेते,लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
रूग्णांच्या सर्व प्रकारच्या आजारांचे अचूक निदान व परिपूर्ण उपचार हे उद्दीष्ट ठेवून वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपचारांचे तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांनी एकत्र येवून  मॅक्सकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली आहे.यात मूत्र विकार तज्ज्ञ,अँड्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ.आनंद काशिद,फिजिशयन व  मधुमेह तज्ज्ञ डॉ.अभिजीत शिंदे,मेंदूविकार शल्य चिकित्सक डॉ. मोहंमद अब्दुल माजिद,भूलतज्ज्ञ डॉ.पंकज वंजारे,कॅन्सर तज्ज्ञ डॉ.सतिश सोनवणे,अस्थिविकार व  जॉइंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ डॉ.प्रशांत पटारे,हृदयविकार तज्ज्ञ डॉ.सुदाम जरे,दमा-क्षयरोग व फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉ.निलेश परजणे,इंटरव्हेंशनल न्युरॉलॉजीस्ट व  मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.मुकुंद विधाते, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.स्मिता पटारे,डॉ.चैताली काशिद,स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.मरीयम माजिद,आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.उज्वल सोनवणे,दंतरोग तज्ज्ञ  डॉ.वर्षा शिंदे,डॉ.संजीवनी जरे,डायरेक्टर डॉ.राजेंद्रकुमार गायके,प्रशासकीय अधिकारी जोसेफ पाटोळे यांचा समावेश आहे.
मॅक्सकेअर हॉस्पिटलमध्ये 28 बेडस्चे अद्ययावत आय.सी.यु., टू डी इको,स्ट्रेस टेस्ट,सी.टी.स्कॅन,डिजीटल एक्स रे,व्हिडिओ गॅस्ट्रोस्कोपी,कॉलोनोस्कोपी,24 तास  इमरजन्सी सेवा,अद्ययावत ऑपरेशन थिएटर,जागतिक दर्जाचे पी ऍण्ड बी व्हेंटीलेटर, ट्रॉमा टिम, लॅप्रोस्कोपी युनिट आदी उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध  आहेत.याशिवाय हॉस्पिटलमध्ये मधुमेह,हृदयरोग,जनरल सर्जरी,एण्डोस्कोपी,अस्थिरोग,न्यूरा सर्जरी,स्त्रीरोग,प्रसूती,वंध्यत्व निवारण,नेत्र विकार,प्लॅस्टिक  सर्जरी,व्हॅस्न्युलर सर्जरी,दंतरोग उपचार,मूत्र विकार,किडनी विकार,कॅन्सर,ट्रॉमा युनिट,मेंदू विकार,क्रिटिकल केअर,कान,नाक व घसा अशा विविध आजारांवरील  उपचारांसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असणार आहेत.कोणत्याही आजारांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे अचूक निदान आवश्यक असते.त्यादृष्टीने जिल्ह्यात प्रथमच  भारतातील अग्रगण्य अशा अपोलो डायग्नोस्टिक्सच्या जागतिक दर्जाच्या पॅथॉलॉजी लॅबची सुविधा मॅक्सकेअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व सामान्य  रूग्णांना विश्‍वसनीय व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी मॅक्सकेअर हॉस्पिटलची उभारणी केली आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यास  नगरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.आनंद काशिद,डॉ. अभिजीत शिंदे व मॅक्सकेअर हॉस्पिटल परिवाराने केले आहे.