Breaking News

बी.एस.पटेल महाविद्यालयाच्या कु.रुचा उगलेची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

बुलडाणा, दि. 25, सप्टेंबर - पिंपळगांव काळे ता. जळगांव जामोद येथील बी.एस. पटेल कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.रुचा रविंद्र उगले हिची निवड  राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली. 21 सप्टेंबर 2017 ला क्रिडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती  येथे विभागीय कुस्ती स्पर्धेत रुचा हिने जिल्ह्याचे नेतृत्व केले व 19 वर्ष वयोगटात बादी मारली.
आडोळ सारख्या छोट्या गावातुन कुस्तीसारख्या खेळामध्ये रुचाने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे. तिते यश पंचक्रोशितला चर्चेचा विषय बनला आहे. तिच्यावर  कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिने प्राप्त केलेल्या विषयावर स्थानिक शाळेत तिचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमात प्रा.इंगळे यांनी तिच्या यशाने प्रेरीत होवुन  मुलींनी स्वत:ला कमी न लेखता सर्वच क्षेत्रात बाजी मारावी व मुलींना हवे त्या मदतीचे आश्‍वासन दिले. तिला या यशापर्यंत नेण्यास क्रीडाशिक्षक प्रा.कचवे ह्यांनी  विशेष परीश्रम व मार्गदर्शन केले. तिच्या राज्यस्तरीय स्पर्धेस समस्त क्रिडाप्रेमींनी  व गावर्‍यांनी यशस्वी होण्यास शुभेच्छा दिल्या आहेत.