Breaking News

वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.राज देवकर बिनविरोध

बुलडाणा, दि. 25, सप्टेंबर - बुलडाणा वकिल संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राजकुमार देवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वकील संघाच्या अध्यक्ष  पदाच्या निवडीसाठी येथील वकिल संघाच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. 
दुपारी 2 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. धिरज मुंढे, अ‍ॅड. आर.डी. मुनोत यांनी दुपारी 2 ते अडीच  वाजेच्या दरम्यान इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठीचा वेळ दिला होता. यात अ‍ॅड. राजकुमार देवकर, अ‍ॅड. विजय सावळे यांनी अर्ज दाखल केले. यापैकी जिल्हा  वकिल संघाचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड.विजय सावळे यांनी आपला अर्ज परत घातल्याने अ‍ॅड.राज देवकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.  निवडणूकीतून वाद-विवाद होऊन देान वकिलांमध्ये गट पडतात. एकमेकांविषयी द्वेषाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे निवडणूक न घेता वकिल  संघाच्या सर्व सभासदांनी एकत्र येऊन अध्यक्षांची एकमताने निवड करावी, अशी भूमीका जिल्हा वकिल संघाच्या वरिष्ठ वकिल सदृश्यांनी मांडली. त्यामुळे निवडणूक न  होता अ‍ॅड. देवकर यांची एकमताने निवड झाली. अ‍ॅड. देवकर यांची वकिल संघाच्या अध्यक्षपदी निवड होताच वकिल बांधवांनी हर्षोउल्हासात या निर्णयाचे स्वागत  केले.
जिल्हा वकिल संघाचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. विजय सावळे व नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. देवकर यांचा संयुक्त सत्कार यावेळी करण्यात आला.