Breaking News

बुलडाणा अर्बन, बीसीसीएन गरबा फेस्टीवलची धूम

पारंपारिक वेशभूषा परिधान करुन संगीताच्या ठेक्यावर थिरकली तरुणाई  

बुलडाणा, दि. 25, सप्टेंबर - भर पावसाचे वातावरण असतांना देखील पारंपारिक वेशभूषा परिधान करुन नटलेली बालगोपाल मंडळी, युवक-युवती आणि महिलाची  संगीताच्या ठेक्यावर थिरकणारी पाऊलं, ’अंबा मात की जय’ च्या जयघोषात पहिल्याच दिवशी दिसून आलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अशा धमाल वातावरणात बुलडाणा  अर्बन, बीसीसीएन गरबा फेस्टीवल - 2017 चा 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रारंभ झाला. 
यावर्षी सहकार विद्यामंदीर परिसरातील सहकार व सांस्कृतिक सभागृहाच्या मैदानावर 21 ते 29 सप्टेंबर या कालावधीत गरबा फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले  आहे. यामध्ये लहान व मध्यम अशा दोन गटात तसेच पारंपारिक वेशभूषा व पोशाखात गरबा खेळल्या जाणार आहे. बुलडाणा अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.  सुकेश झंवर यांचे हस्ते गरबा फेस्टीवलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजन समिती अध्यक्षा कोमलताई झंवर उपस्थित होत्या. डॉ. सुकेश झंवर यांनी  नवरात्रोत्सवानिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या. नवरात्रोमध्ये खेळला जाणारा गरबा रास म्हणजे देवीची पुजा असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या फेस्टीवलमध्ये सहभागी  होवून गरबा सोहळयाचा आनंद घ्यावा व रसिक प्रेक्षकांनी देखील दाद द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रथम दिवसाच्या बक्षीस वितरण सोहळयास जि.प.सदस्या जयश्री शेळके, सरिता अहेर, वैशाली राजपुत, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक गोसावी, ऑस्ट्रेलिया येथून  आलेले मोकस, प्रेमकुमार राठोड उपस्थित होते. दोन्ही गटातील कलावंतांना पहिल्या दिवशीचे टॉप टेन, बेसट कॉरच्युम तसेच प्रिन्स ऑफ दि डे आणि प्रिसेस ऑफ  दि डे हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.