Breaking News

पित्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

सांगली, दि. 23, सप्टेंबर - सांगली शहरातील वाल्मिकी आवास परिसरात राहणा-या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पित्यानेच लैंगिक छळ केल्याची घटना  शुक्रवारी उघडकीस आली आहे. याबाबत पीडीत मुलीने नराधम पित्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा ङ्गिर्याद दाखल केली आहे. 
सांगली शहर पोलिस ठाण्यात अशा पध्दतीने एकाच आठवड्यात दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चारच दिवसापूर्वी एका सज्ञान मुलीने  एसटी महामंडळात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या आपल्या पित्याविरोधात बलात्कार केल्याची ङ्गिर्याद दाखल केलेली आहे.
शुक्रवारी पुन्हा अशाच पध्दतीने एका 13 वर्षीय मुलीने आपल्या बापाविरोधात लैंगिक अत्याचार केल्याची ङ्गिर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच  सांगली शहरातील काही महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पीडीत मुलीचा जाबजबाब व  ङ्गिर्याद दाखल करून घेण्याचे काम सुरू होते.