Breaking News

जिल्हा नियोजन समितीच्या 40 सदस्यांची निवड

औरंगाबाद, दि. 23, सप्टेंबर - जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) 40 सदस्यांची निवड गुरुवारी (दि.21) करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात  निवडणूक निर्णय अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला. यासाठी बुधवारी (दि.20) विविध प्रवर्गातील 18  जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. तत्पूर्वी, 22 जागा बिनविरोध निवडणूक आल्याने उर्वरित जागेसाठी मतदान प्रक्रिया झाली होती. यात 96.50 टक्के मतदान  झाले होते.. महापालिकेच्या 13, जिल्हा परिषदेचे 24 आणि नगरपालिका क्षेत्रातील तीन अशा एकूण 40 सदस्यांची निवड निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर  केली. 22 सदस्यांची पूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने 18 जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दोन ठिकाणी तर अकृषक  विभागाच्या परिसरातील एका अशा तीन केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. यात जिल्ह्यातील 286 पैकी 276 मतदारांनी हक्क बजावला होता. गुरुवारी  जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची निवड जाहीर करण्यात आली. यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शिवाजी  शिंदे, देवेंद्र कटके, दीपक चव्हाण आदींनी काम पाहिले.