Breaking News

साता-याच्या प्रथमेश यादव याची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड

सातारा, दि. 24, सप्टेंबर - मे 2017 रोजी राष्ट्रीय स्तत्ता 10 वी साठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (एन.टी.एस) घेण्यात आली होती. या परीक्षेत सातारा येथील  अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश सुहास यादव याची राष्ट्रीय शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे. 
विद्यार्थ्याची बुध्दीक क्षमता विकसित व्हावी या माध्यमातून विद्याशाखा व राष्ट्राची सेवा व्हावी ही योजनेचे उद्दिष्ट्ये आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व  प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली (एन.सी.ई.आर.टी) यांच्याद्वारे दोन स्तर परीक्षेतून देशातून एक हजार विद्यार्थी निवडले जातात. यातून या प्रथमेश यादवची निवड झाली  आहे. त्याला आता इयत्ता 11 वी पासून पदवीत्तर शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.याबद्दल त्याचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी अभिनंदन  केले. त्याला मुख्याध्यापक कमलाकर महामुनी, श्रीमती पोतदार, डॉ.सुहास यादव, डॉ.वैशाली यादव यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. याबद्दल त्याचे नागठाणे व  परिसरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.