Breaking News

कर्नाटकातील कांद्याची मागणी मंदावल्याने लासलगाव कांदा बाजारभावात वाढ

लासलगांव, दि. 22, सप्टेंबर - येथील बाजार आवारात आज कांद्याने उचांक गाठत 1900 रु पर्यन्त भाव मिळाला असून सरासरी 1720 रु मिळाला. कर्नाटक  मधील नवीन कांदा खराब निघाल्यामुळे इतर देशात जाणार कर्नाटकचा कांदा कमी झाला असून परिणामी लासलगाव कांदा बाजार समितीतील कांद्याला मागणी  वाढत कांद्याचा भाव देखील वाढल्याचे आज बघायला मिळाले. 
कालपर्यंत 1000 रुपयांना जाणारा कांदा आज तब्बल 1900 रुपये झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून बाजार आवारात हळूहळू  कांद्याची आवक वाढण्यास देखील सुरुवात झाली आहे. आज एकूण 1000 वाहनातून 18 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून कमीत कमी 900 तर जास्तीत  जास्त 1930 व सरासरी 1720 असा कांदा बाजार भाव मिळालेला दिसून आला. लिलावा उशिरापर्यंत सुरू असल्याने आवकेचा आकडा अजूनही वाढण्याची  शक्यता आहे.