Breaking News

पदावर असेपर्यंत जनतेची सेवा करत राहणार - दिवाकर रावते

औरंगाबाद, दि. 23, सप्टेंबर - भाजप शिवसेना युतीचे काय होणार हे मी सांगू शकत नाही पण मी सच्चा सैनिक आहे. पदावर असेपर्यंत मी जनतेची सेवा करत  राहणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे सांगितले. भाजप सेनेच्या सरकारमधील युतीच्या भवितव्याबद्दल बोलायचे टाळले. या वेळी त्यांनी  शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करणा-या अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली. कोण रवी राणा ? ज्यांना स्वत:चा पक्ष नाही ते  दुस-या पक्षाबद्दल बोलतात कशाला? असा टोला त्यांनी मारला.
आपले काम उत्तमरित्या चालले असून दस-यानंतरही तुम्ही असेच निर्णय घ्याल का, शिवसेना भाजप युतीचे सरकार पाच वर्ष पुर्ण करणार का असे विचारले असता  पदावर असेपर्यंत जनतेसाठी काम करेन, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.