Breaking News

संरक्षण खाते सक्षमतेने सांभाळण्याची सीतारामन यांच्याकडे क्षमता - जेटली

नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - पूर्णवेळ संरक्षण मंत्री पदावर नियुक्ती झालेल्या निर्मला सीतारामन यांचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि गोव्याचे मुख्यमंत्री  मनोहर पर्रिकर यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निर्मला सीतारामन अत्यंत कार्यक्षम आहेत आणि त्या संरक्षण खात्याची  जबाबदारी उत्तमपणे सांभाळतील याची मला खात्री आहे, असे अरूण जेटली म्हणाले. वार्षिक संरक्षण मंत्री बैठकीत सहभागी होण्यासाठी आज रात्री जपानला रवाना  होणार आहे. यानंतरच सीतामरण संरक्षण पदाची सांभाळतील, असेही जेटली म्हणाले.
पर्रिकर यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सीतारामन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या पूर्णवेळ संरक्षण मंत्री पदाची शपथ घेतल्याबाबात सीतारामन यांचे अभिनंदन,  असे पर्रिकर यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.