नव्या मंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - मंत्रिमंडळ विस्तारात आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शपथविधी सोहळ्यात आज 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली आहे. या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी रवाना झाले आहेत. नव्या मंत्र्यांनी आपले अनुभव आणि नव्या विचारांद्वारे देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. नव्या मंत्रिमंडळात केरळ, कर्नाटक, दिल्ली, राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेश येथील मंत्र्यांचा समावेश आहे.