लुधियाना ते दिल्लीदरम्यान विमान सेवा सुरू
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - केंद्र सरकारच्या ‘उडे देश का आम नागरिक’ (उडान ) योजनेंतर्गत लुधियाना ते दिल्ली थेट विमान सेवेला आजपासून सुरूवात झाली. एअर इंडियाच्या विमानाने आज दिल्ली विमानतळावरून 45 प्रवाशांना घेऊन उड्डाण केले. ही सेवा सोमवार, मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी या दिवशी उपलब्ध असणार आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उडान सेवेच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या सेवेसाठी प्रवाशांना 2 हजार 500 रूपये मोजावे लागणार आहेत, अशी माहिती लुधियानाचे साहनीवाल विमानतळाचे संचालक ए.एन शर्मा यांनी दिली.