Breaking News

मुंबईहून गुजरातला जाणारी रेल्वे वाहतूक दोन तास उशीरा

मुंबई, दि. 23, सप्टेंबर - सफाळे रेल्वे स्थानकाजवळ सिमेंट स्लीपर्स बदलण्याच्या कामात विलंब झाल्यामुळे मुंबईहून गुजरातला जाणा र्‍या रेल्वे सुमारे दीड ते दोन  तास उशिराने धावत आहेत. यामुळे बोईसर, डहाणू, वापी आणि उंबरगाव भागात जाणा-या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. प्रवाशांची गैर सोय होऊ नये म्हणून सर्व  एक्सप्रेसना डहाणू ते विरारपर्यंतच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. रेल्वे वाहतूक दोन तास उशिरा सुरू झाल्याचा परिणाम मुंबईकडे येणा-या रेल्वेवर दिसून  आला आहे. मुंबईहून येणारी रेल्वे तासभर उशिराने धावत आहे.