Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शरद पवार यांचा सत्कार

नवी मुंबई, दि. 23, सप्टेंबर - महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोमवार  25 सप्टेंबर रोजी नवी मुंबईत होणा-या कार्यक्रमात पवार यांचा सत्कार होणार आहे. अण्णासाहेब पाटील यांची जयंती एपीएमसी मार्केटमध्ये साजरी केली जाणार  आहे. यावेळी माथाडी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.