Breaking News

मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी ; सुरक्षा वाढवली

मुंबई, दि. 13, सप्टेंबर - मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या कक्षाशेजारी बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्याने न्यायालय परिसरातील  सुरक्षेत वाढ करण्यात आली होती . बॉम्ब शोधक पथकाने न्यायालय परिसराची कसून तपासणी केल्यानंतर बॉम्ब ठेवल्याची अफवाच होती असे स्पष्ट झाले . तरीही  खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती . आज सकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला चेल्लुर यांच्या कक्षाशेजारी बॉम्ब ठेवला  असल्याचा दूरध्वनी आला . त्या मुळे पोलिसांनी बॉम्ब शोधक श्‍वान पथकाला तातडीने पाचारण केले . संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी केल्यानंतर काहीच  मिळाले नाही .