Breaking News

विराट कोहल स्मिथपेळी सरस : मायकल क्लार्क

नवी दिल्ली, दि. 13, सप्टेंबर - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पराभवाला कधीही भीत नाही. तो विजयासाठी आक्रमकतेने संघाचं नेतृत्त्व करतो, असं  ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने म्हटलं आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगलीचं नेतृत्त्व नेहमीच खात्रीशीर होतं. तो खर्‍या अर्थाने कौतुकाला पात्र आहे. गांगुलीने भारतीय संघात चांगलं वातावरण तयार  केलं, जे महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांनी त्यांच्या पद्धतीने पुढेही कायम ठेवलं. सध्याच्या भारतीय संघात आक्रमकता आहे. विराट कोहली पराभवाला न  भीता संघाचं आक्रमकपणे नेतृत्त्व करतो, असं मायकल क्लार्क म्हणाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीची तुलना कशी  कराल, असाही प्रश्‍न मायकल क्लार्कला विचारण्यात आला. विराट कोहली उत्तम वन डे फलंदाज असल्याचं मायकल क्लार्कने मान्य केलं. विराट कोहली वन डेत  निश्‍चितच चांगला फलंदाज आहे. मात्र दोघांमध्ये थोडंसं अंतर आहे. दोघेही चांगले खेळाडू आहेत. पण कर्धणार म्हणून तुमच्या नेतृत्त्वात संघ कशी कामगिरी करतो, ते  महत्त्वाचं असतं. स्मिथला मी चांगला कसोटी फलंदाज मानतो, असं मायकल क्लार्क म्हणाला.