Breaking News

वेतन न मिळाल्याने ’पीएमपीएमएल’ चे कर्मचारी संपावर

पुणे, दि. 13, सप्टेंबर - पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ( पीएमपीएमएल) च्या कोथरूड आगारातील मधील 60-70 बस चालकांनी पगार न मिळाल्याच्या  कारणामुळे आज सकाळपासून संप केला आहे. परिणामी वाघोली, मनपा भवन, वारजे माळवाडी, कोंढवा गेट, कात्रज, कोंढवा, अप्पर मार्गावरील रस्त्यावरील बस  सेवा विस्कळीत झाल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना ताटकळावे लागले. 
याबाबत दुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पीएमपीएमएलच्या जेएनएनआरयुएम मधून मिळालेल्या गाड्या प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्सने चालवायला घेतल्या आहेत. त्यांच्या  चालकांचे पगार अद्याप झालेले नाहीत. म्हणून आज सकाळी 60- 70 जणांनी संप केल्याची माहिती मिळाली आहे.
या गाड्या प्रामुख्याने वारजे माळवाडी ते वाघोली , कोथरूड ते विश्रांतवाडी, वारजे माळवाडी ते वाघोली, एनडीए गेट ते मनपा भवन, कोथरूड ते कात्रज, कोथरूड  ते कोंढवा या मार्गावरील बससेवा विस्कळीत झाली.