केंद्रीय मंत्रिमंडळात तरूणांना स्थान नाही; काँग्रेसची टीका
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नागरिकांचा भरणा अधिक असल्याची खोचक टीका काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केली. काही मंत्र्यांची हकालपट्टी करून मोदी यांनी अपयशी ठरल्याचे कबुल केले आहे. तीन वर्षांच्या कार्यकाळात राजीवप्रताप रूडी, बंडारू दत्तात्रेय, कलराज मिश्रा यांनी जनतेसाठी काहीच कामे केली नाहीत म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असावी, असेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तिवारी बोलत होते.
अति महत्त्वाच्या व्यक्तींची कामे केल्यामुळे काही मंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी गेल्या 38 महिन्यांत सर्व साधारण माणसांसाठी काहीच काम केले नाही. त्यांनी केवळ अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी कामे केली आहेत त्यामुळेच त्यांना बढती देण्यात आल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे.