Breaking News

ग्राहकांचा अतूट विश्‍वास व पाठिंब्यामुळे महाराष्ट्र बँकेची 83 वर्षांची वाटचाल यशस्वी

अहमदनगर, दि. 23, सप्टेंबर - ग्राहकांच्या अतूट विश्‍वासामुळे व भक्कम पाठबळामुळे बँकेने 83 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे.भविष्यातही ग्राहकांना  अत्याधुनिक बँकिंग सेवा देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक दीपक भंडारी यांनी केले .
बँकेच्या 83 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजीत ग्राहक मेळाव्याचे उदघाटन भंडारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांनी बँकेच्या  प्रगती विषयीची आकडेवारी उपस्थितांसमोर मांडली.तसेच बँकेच्या विविध योजनांची माहिती ही दिली.यावेळी उपस्थित ग्राहकांनी बँकेच्या कामाकाजाबाबत आपापले  मनोगत व्यक्त केले.कडू-गोड अनुभवदेखील सांगीतले.तसेच बँकेच्या कामकाजात सुधारणा होण्याच्या दृष्टीने काही सुचनादेखील केल्या.यावेळी बांधकाम,उद्योग,शैक्षणिक  तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच बँकेचे सर्वश्री रणजीत कुमार,विवेक चौसाळकर,ईश्‍वर पाटील,विनायक पवळे,प्रदीप जोशी,अनिल करायत,मयूर पाटील आदी  उपस्थित होते.निलीमा थत्ते यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.विवेक चौसाळकर यांनी आभार मानले.