Breaking News

’ठाणे द सीटी’च्या छायाचित्रांचे प्रदर्शन

ठाणे, दि. 03, सप्टेंबर - अपॅक फोटोग्राफी इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी ’ठाणे द सीटी’ ह्या विषयांवर काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन कोरम मॉल, ठाणे येथे  भरविण्यात आले आहे. कोरममध्ये दुस-या मजल्यावर सकाळी 11 ते 9. या वेळात प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे. तसेच 5 सप्टेंबरपर्यंत असलेल्या या  प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे. 
आपण फोटोग्राफी शिक्षणाविषयी आपले प्रश्‍न या ठिकाणी विचारू शकता. ठाणे शहराच्या महापौर सौ. मिनाक्षीताई शिंदे यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या उपक्रमाचे  कौतुक केले आणि ठाणे शहर असे बघण्याचा योग हा या ऊपक्रमाद्वारे प्रथमच येत आहे अशी प्रतिक्रिया दिली. या ठिकाणी जास्तीत जास्त ठाणेकरांनी भेट देऊन या  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहीतीसाठी या 9323950977 क्रमांकावर संपर्क साधावा.